देवा, मला फक्त एक गर्लफ्रेन्ड देएमपीएस्सीचा अभ्यास करणारी
स्टडी सर्कला असणारी
स्टडी रुम मध्ये ध्यान लावून बसणारी
फक्त एक G. F. दे...
वाचता वाचता झोपणारी
दंड बैठका मारणारी
आणि एका दमात सिंहगड चढणारी
फक्त एक G. F. दे...
पंजाबी ड्रेस घालणारी
जिन्समध्ये रमणारी
आणि साडी मध्ये खुलणारी
फक्त एक G. F. दे...
माझ्याकडं चोरुन पाहणारी
खुद्कन गाली हसणारी
आणि फक्त माझ्यासाठीच झुरणारी
फक्त एक G. F. दे...
"मंगला'ला पिक्चर पाहणारी
माझ्यासोबत मुंबई फिरणारी
आणि फक्त माझ्यावरच मरणारी
फक्त एक G. F. दे...
शेतात काम करणारी
दोघांच्या आई बापाला जपणारी
आणि घराचं घरपण वाढविणारी
फक्त एक G. F. दे...
चहाचे फुरके मारणारी
चिकन रस्सा चापणारी
आणि चुलीवर भाकरी थापणारी
फक्त एक G. F. दे...
थोडी फार लाजणारी
हळूच मला बिलगणारी
आणि मलाच I Love You म्हणणारी
फक्त एक G. F. दे...
'Z'Bridge वर भेटणारी
खांद्यावर डोके ठेवून बोलणारी
आणि हळुच कुशीर शिरणारी
फक्त एक G. F. दे.. :)
