"हुंकार नाळ" मराठी कविता
जन्म मरण तुमच्या हाती माझेमी बोलते गर्भातील हुंकार बाळ
खेळूद्या मला अंगणी तुमच्या
नका कापू गर्भात माझी नाळ..
जरा विचार करा,माझ्या जीवाचा
केले तुम्ही पाप,बोलाना साफ
विझली आग,उरले मी पोटी राख
नका मारू,का करता माझे काप..
नका मारू मला,येउद्या जन्मास
मी लेक तुमची,लावीन लई माया
विचार गर्भपाताचा,ही कसली आस
वाचवून मला द्यावी,मायेची छाया..
नका मारू मला,मुला सारखी मी
होऊन मोठी,फेडील तुमचे पांग
प्रत्येक स्पर्धेत सहभागी होईल
ना कमी मी लावील बक्षीसाची रांग..
नका मारू मला,गर्भाची मी कळी
फुलेल तुमच्या दारी,दिसे नंदनवन
घेईल मी झाशी,सावित्रीचा तो वसा
गर्वाने करीन बाबा,उंच तुमची मान..
समजून सांगते बाबा शब्दार्थ माझा
का माझा हुंकार कळत कसा नाही
मुलगा मुलगी सम आसते ग बाई
गर्भातील हुंकार मला बोलूदे ग आई..
कवि - प्रकाश शेंडगे
मु.तिगाव ता.वडवणी जी.बीड
मो.7798530606.
0 Comments