हात तुझा हातात आल्यावर : मराठी प्रेम कविता

प्रेमामध्ये फार वेळेस असे होते की, आपल्या प्रेयसी सोबत राहून सुद्धा आपण कसलाही स्पर्श करत नाहीत. विचार करा जर तुम्हाला प्रेयसी असेल आणी तिने पहिल्यादाच हात तुमच्या हातावर ठेवला काय त्या भावना असतील हो!

Latest Marathi Love Poem


Latest Marathi Love Poem | हात तुझा हातात आल्यावर

हात तुझा हातात आल्यावर स्मित ओठांवर पसरु दे,
गजरा माळतांना केसांत तुझ्या मीच फुल बनुन फुलु दे !!
हास प्रिये एकदाच मला क्षणभर तरी जगु दे,
होईन तुझसाठी फुलपाखरु तुझ्या तळव्यावरी बसुदे !!
होईन घन निळा मी तुला चिंब करुन जाऊदे,
हास प्रिये एकदाच मला क्षणभर तरी जगु दे !!
होईन तान मी त्या कान्हाची तुला गुंग करुनी जाऊदे,
होईन मोरपीस मी तुझसाठी वा-यावरी मज ऊडु दे !!
हास प्रिये एकदाच मला क्षणभर तरी जगु दे,
हात तुझा हातात आल्यावर स्मित ओठांवर पसरु दे !!

हि कविता कशी वाटली नक्की सांगा व मित्रांनाही पाठवा, धन्यवाद !

Post a Comment

0 Comments